भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मोठी बातमी : गाईला मिळाला “राजमाता – गोमाता” चा दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l शासनाने गोमातेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” म्हणून घोषीत करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” म्हणून घोषीत करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी महत्त्वाचे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार
पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध खात्यांसह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत.

प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” म्हणून घोषीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना “कामधेनू” असे संबोधण्यात आलंय. दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मात्र देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!