दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता १२ वी अर्थात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि इयत्ता १० वी अर्थात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात.
त्या नुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.
परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता येत्या २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी आणि इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे.