भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मोठी बातमी : सरकारी जागांवरील सर्व होर्ड्रिंग्ज काढा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

घाटकोपर दुर्घटनेवरून राज्य सरकारला जाग

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील  सरकारी जागांवरील सर्व अवैध होर्ड्रिंग्ज काढण्याचे आदेश राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबई मधील घाटकोपर येथील छेडानगर भागातील पूर्व द्रुतगती मार्ग जवळच्या पेट्रोल पंपावर ४० बाय ४० स्केअर फुटची परवानगी असताना तब्बल १२० स्केअर फुटाचे अनधिकृत अजस्त्र होर्ड्रिंग्ज लावण्यात आलं होतं. त्यात १४ पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा बळी गेला. कित्येक लोक जखमी झाले. राज्यात अनेक ठिकाणी सरकारी जागांवर मोठमोठे अजस्त्र होर्ड्रिंग्ज लावण्यात आले आहेत.

या घाटकोपर दुर्घटने नंतर राज्य सरकार जागे होत ॲक्शन मोडवर येत राज्य भरातील सरकारी जागांवरील सर्व अवैध होर्ड्रिंग्ज काढण्याचे आदेश राज्यसरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!