मोठी बातमी : परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी “तिसरा डोळा”
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पुढील काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठं पाऊल उचललं आहे.
१० वी आणि १२ च्या परिक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळी नंतर परीक्षा केंद्राची झाडाझडती घेतली जाणार आहे. CCTV असेल तरच परीक्षा केंद्र कायम राहणार असल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. CBSC परीक्षेच्या धर्तीवर राज्य मंडळाच धोरण आहे. राज्य मंडळाच्या या धोरणाने विद्यार्थ्यांची सुरक्षा व गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. असं राज्य मंडळाने म्हटल आहे.