लाडक्या बहिणींच्या प्रमुख उपस्थितीत अमोलदादा जावळे यांच्या प्रचाराचा फैजपूर येथे भव्य शुभारंभ
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे तरुण उमेदवार, अमोलदादा हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ ४ नोव्हेंबर २०२४ रोजी फैजपूर येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान येथे होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता प्रारंभ होईल, ज्यामध्ये केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आणि पाच लाडक्या बहिणींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शुभारंभा नंतर फैजपूर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या मध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचा तपशील:
स्थळ: श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूर
वेळ: सकाळी ९:३० वाजता
विशेष उपस्थिती:
रक्षाताई खडसे (केंद्रीय मंत्री)
गिरीशभाऊ महाजन (राज्य मंत्री)
उद्घाटनानंतर: फैजपूर शहरात प्रचार रॅली.
रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना या ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुती कडून करण्यात आले आहे.