चर्मकार विकास संघ व संत शिरोमणी गुरु रविदास बहुउद्देशीय सस्थेतर्फे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची भव्य शोभा यात्रा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील जिल्हा चर्मकार विकास संघ व संत शिरोमणी रविदास बहुउद्देशीय संस्था,जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांची 648 वी जयंती चर्मकार बंधू भगिनींच्या मोठ्या उपस्थितीत व उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
या शोभायात्रेच्या सुरुवातीस रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जळगांव म.न.पा .माजी महापौर सौ. सीमाताई भोळे, समाज कल्याण कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे , चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, वसंतराव नेटके, काशिनाथ इंगळे जिल्हाध्यक्ष अँड चेतन तायडे, गुरू रविदास महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष खंडुजी पवार, उपाध्यक्ष उत्तम सोनवणे, शहर जिल्हाध्यक्ष अँड. अर्जुन अण्णा भारुळे ,उपाध्यक्ष गजानन दांडगे , सचिव प्रा.श्री.धनराज भारुळे, अँड. शैलेंद्र पवार कोषाध्यक्ष कुणाल तायडे , मनोहर जोनवाल, सह सचिव मनोजभाऊ सोनवणे, बालकृष्ण खिरोळे प्रमुख अतिथी धीमंत पी.आर. आंबेडकर, विजय पवार, डॉ. सुनील सूर्यवंशी,बीराजेश वाडेकर राजेंद्र बाविस्कर, यशवंत ठोसरे, धनराज मोतीराय कैलास वाघ, कुणाल तायडे, राजेश वाडेकर, काशिनाथ इंगळे, रतीराम सावकारे , बाळासाहेब घुले, प्रदीप शेकोकार तुळशीराम भारुळे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रेल्वे स्टेशन पासून शोभायात्रेस सुरवात करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थी लेझीम पथक,ढोल ताशे ,झेंडा पथक ,कलशधारी महिला ,संत रविदासांची सजीव आरास तसेच सतगुरु रविदास यांच्या प्रतिमेची सजविलेल्या बग्गीतून मिरवणूक काढण्यात येऊन संत रविदास यांच्या दोह्यांचा प्रचार व प्रसार करण्यात आला.ही शोभायात्रा विविध चौकातून मार्गक्रमण करीत या शोभा यात्रेचा समारोप तहसील कार्यालया जवळील पत्रकार भवन येथे समारोप करण्यात आला.
या ठिकाणी घेण्यात आलेल्या चर्मकार समाज प्रबोधन मेळाव्यात उपस्थित प्रमुख अतिथी यांचे हस्ते संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांच्या जीवनकार्याची माहिती धीमंत पी.आर. आंबेडकर, धनराज मोतीराय, अँड. चेतन तायडे , खंडू पवार यांनी देऊन चर्मकार समाजाने संघटित होण्याचे व समाजा ची सर्वांगीण प्रगती करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वानखेडे सर, पंकज तायडे , शिवदास कळसकर, कमलाकर ठोसर, बीरवींद्र नेटके,श्री.पंकज तायडे, कमलाकर ठोसर,श्री.यशवंत वानखेडे, प्रा. संदीप शेकोकार, संदीप ठोसर, हिरामण सोनवणे, चुडामण सोनवणे, प्रदीप शेकोकार आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला.या समाज प्रबोधन मेळाव्यात चर्मकार समाजातील विविध पोटजातीमधील बहुसंख्य चर्मकार बंधू भगिनी,लहान,थोर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.