भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठ्या घडामोडी घडणार, “या” तारखे पर्यंत राजकीय भूकंप होणार…. कोणी केला हा दावा…

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडधाम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मोठी उलथापालथ होणार, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्त वाहिनिशी बोलताना हा दावा केला आहे. तसेच त्यांनी राजकीय भूकंपाच्या संभाव्य तरखाही सांगितल्या. येत्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीत मोठा भूकंप होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

८ ते १२ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार आहे. सत्तेतील पक्ष व बिगर पक्ष या भूकंपाचा भाग राहतील, या निमित्तानं महाराष्ट्राला मोठं सरप्राइज मिळणार असल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.निवडणुकीच्या आधी व नंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार. असा गौप्यस्फौट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मात्र वंचित या भूकंपाचा भाग राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं.राज्यात दंगल होऊ न देणे हा आमचा उद्देश होता व आहे. आम्ही आत्ताही शांतीदूत म्हणूनच राहणार आहोत, असंही प्रकाश आंबेडकर या वेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!