निंभोरा कृषी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवाद
निंभोरा,ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निंभोरा,ता. रावेर येथील कृषी तंत्र विदयालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष कृषी विद्यालय निंभोरा प्रल्हाद भाऊ बोडे हे होते. तर विशेष प्रमुख अतिथी अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे हे होते.
प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सामुहिक पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटविल्या सामुहिक त्रिशरण पंचशील बौद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या प्रसंगी प्रा. संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले डॉ. आंबेडकर जागतिक विद्याविभुषित महामानव असुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगात सर्वात जास्त पुतळे असणारे महामानव असुन त्यांचे आचार विचार अंगीकृत करून आजच्या युवा पिढीने त्यांच्या विचाराच्या दिशेने वाटचालं करावी असे सांगितले.
तर अध्यक्षीय भाषण करतांना प्रल्हाद बोडे यांनी सांगितले कि, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपुर्ण भारतातील प्रत्येक नागरिकांला एक मताचा अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातुन मिळवुन दिला. असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे ,विलास सावकारे होते. तर या प्रसंगी प्राचार्य मोहन भंगाळे उपप्रचार्य विवेक बोडे, प्रा. संदीप महाजन, मानव अधिकार जिल्हा उपाध्यक्ष डॉ. धनराज बावस्कर, जितेंद्र भावसार , जितेंद्र कोळंबे, बापु कोळी, रोहित तायडे, अक्षय भालेराव, प्रथमेश पाटील, दिपक कोळी, विनीत प्रजापती, चिन्मय फेगडे, रोहित चौधरी, लोकेश पाटील, चंदन पाटील, जयेश कोंडे सह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विवेक बोडे यांनी केले तर आभार प्रा. संदीप महाजन यांनी केले.