सावदा येथील श्री.आ.गं.हायस्कूल व श्री ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात एड्स जनजागृती
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्रीमती आनंदीबाई गंभीरगाव हायस्कूल व श्री नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे जनजागृती निमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यामार्फत श्री आदरणीय श्री महेंद्र सुरवाडे श्री सुनील महाजन समुपदेशक श्री ग्रामीण रुग्णालय रावेर व यांनी आमच्या विद्यालयाला भेट देऊन इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना एड्सच्या संदर्भात सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.
समाजात वावरताना आपण कशा पद्धतीने काळजी केली पाहिजे व येऊन संबंधाच्या संदर्भात आपण कशा पद्धतीने अवेअरनेस लागला पाहिजे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन देऊन विशेषता तरुण-तरुणींमध्ये याविषयी जागृती व सावधानता असावी असा इशारा त्यांनी दिला . एचआयव्हीचा संसर्ग यामुळे होतो व एच आय व्ही चा संसर्ग कसा टाळावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले मी हा प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री एस एम महाजन आदरणीय श्री बी ए तेली आदरणीय श्री राठोड आदरणीय श्री मनोज महाजन सर आदरणीय सौ भारती भंगाळे मॅडमआदरणीय श्री एस बी नागपुरे सर आदरणीय श्री एचपी महाजन सर हे उपस्थित होते

