गुटखा व सुगंधित तंबाखूसह ५ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणारे वाहनावर चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात कारवाई करत ५ लाख ५६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात प्रविण सुरेश पाटील हा राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करत असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना मिळाली होती. चीलीसगाव पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सोमवार १० जून रोजी दुपारी ३ वाजता वाहन क्रमांक . एम एच १९ सी वाय ६७४३. या वाहनातून प्रविण सुरेश पाटील हा वाहतूक करून घरात साठवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी यावर कारवाई करत गुटखा व सुगंधित तंबाखूसह वाहन असा एकुण ५ लाख ५६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्टेबल राहूल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रविण सुरेश सोनवणे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.