भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात तालुक्यात गुटखा तस्करी थांबेना; पुन्हा ३५.५२ लाखांचा ऐवज जप्त !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातून पुन्हा एकदा अवैध गुटखा तस्करी समोर आली असून अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहन सह सुमारे ३५.५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आली असून स्थानिक पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

तालुका अवैध धंद्यांच्या बाबतीत नेहमी चर्चेत असतो पण अवैध धंदे बंद होतांना काही दिसत नाही काल पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव येथील पथकाने मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूरच्या दरम्यान पूर्णा नदीच्या जवळ प्रतिबंधीत गुटखा, सुगंधी मसाला आणि तत्सम सामग्री एमएच २० ईएल ५८४९ आणि एमएच २० १७३७ या क्रमांकांच्या दोन वाहनांमधून वाहतूक करत असताना ३५ लाख ५२ हजार रूपये मूल्याचा ऐवज जप्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहन चालक शकील रशीद शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) व क्लीन फैजान इम्रान काचालिया (रा. छत्रपती संभाजीनगर) तसेच दुसर्‍या वाहनाचा चालक शेख मोहसीन शेख ईस्माईल व क्लीनर शेख फरहान शेख शाहनवाज यांच्यासह जळगाव येथील सुशील रमेश गेही आणि बर्‍हाणपूर येथील साईनाथ ट्रेडर्सचा संचालक आशीष बुधराणी यांच्या विरोधात भादंवि कलम १८८, २७२, २७३; ३२८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील चार संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. मात्र अवैध गुटखा तस्करीबाबत नेहमीच ओरड होत असताना पोलीस प्रशासन मात्र यावर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!