१ लाख ८७ हजारांचा गुटखा साठा जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गोडाऊन वार छापा टाकून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला असून १ लाख ८७ हजार ३०३ रूपयांचा पान मसाला व सुंगधीत तंबाखू / जर्दा जप्त केला आहे. ही कारवाई चोपडा येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दीं. २४ ऑक्टोबर गुरूवार रोजी मोठ्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास नायरा पेट्रोल पंपाच्या मागील भागात राहणाऱ्या मोहम्मद कादिश शेख आयुब, वय ३८ वर्ष. रा. केजीएन कॉलनी, यांच्या घरात व घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊन मध्ये प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुंगधीत तंबाखू / जर्दा १,८७,३०३ रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.