मुक्ताईनगरात पुन्हा गुटखा वाहतूक उघड, पत्रकारांच्या पुढाकाराने २६ लाख ४५ हजाराचा माल हस्तगत !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा मध्यप्रदेशातील बुरहाणपुर वरुन मुक्ताईनगर मार्गे जळगाव येथे जात असलेला लाखों रुपयांचा गुटखा मुक्ताईनगर व बोडवड तालुक्यातील पत्रकारांनी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याने पुन्हा एकदा गुटखा वाहतूक सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीसांनी माहितीनुसार २६ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल असल्याचे समजते. तालुक्यात सुरु असलेल्या या अवैध धंद्यांना कोण पाठबळ देत आहे असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर मार्गे रावेर येथे खासगी कामासाठी दि.9 रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास सदर पत्रकार हे जात असतांना बोलोरो पिक क्रमांक एमएच. १५ एचएच १०८८ ही गाडी भरधाव वेगाने मुक्ताईनगर कडे पुरनाड फाट्यावरून जात असतांना गाडी चालकाच्या हालचाली वरून सदर गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची शंका आल्याने पुरनाड फाट्याजवळ गाडी थांबवली असता सदर गाडी चालक याची विचारपूस केली असता एवढ्या भरधाव वेगाने गाडी का चालवत आहे असे विचारले असता गाडी मध्ये अवैध गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली.
तसेच तात्काळ दुरध्वनीद्वारे मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांना संपर्क करून संबंधित गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली आहे तरी आपण आपल्या पोलिस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवावे व गाडी ताब्यात घ्यावी असे सांगण्यात आले त्या अनुषंगाने काही वेळात दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर गाडी पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आली व चालक चेतन बारी रा.जळगांव यांना पत्रकारांन समोर विचारपूस केली असता मुळ जळगाव चे असल्याचे सांगितले
यासंदर्भात मुद्देमाल २६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती पीआय नागेश मोहिते यांनी दिली आहे. सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस स्टेशन मध्ये सुरू आहे.