क्राईमरावेर

रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यात गुटखा तस्करावर मोठी कारवाई करण्यात आली असून मध्यप्रदेश – महाराष्ट्र सीमेवरील रावेर तालुक्यातील चोरवड चेकपोस्ट जवळ वाहन तपासणी दरम्यान महाराष्ट्र राज्यात आरोग्यास अपायकारक असल्याने बंदी असलेला १४ लाख रुपयांचा गुटखा रावेर पोलिसांनी पकडला असून त्या सोबत ८ लाखांची गाडी सुद्धा रावेर पोलिसांनी जप्त केली आहे .या कारवाई मुळे गुटखा माफियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेवरील रावेर तालुक्यातील चोरवड चेक पोस्ट नाका येथे नाकाबंदी दरम्यान एम एच ०४ एच वाय ६५१५ महिंद्रा बोलेरो कंपनीची चारचाकी गाडी बऱ्हाणपूर कडून येत असताना त्या गाडीला पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता, गाडीत सुमारे १४ लाखांचा सुगंधित केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा व तंबाकूजन्य गुटखा मिळून आला. या प्रकरणी रावेर पोलिसांनी यावल तालुक्यातील रिजवान शेख रऊफ.वय २८ वर्ष. व शेख शोयब शेख शरीफ. वय २७ वर्ष. दोघी राहणार छत्री चौक, पठाण वाडी, फैजपुर ता. यावल, या दोघांना अटक करण्यात आली असून यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना रावेर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंग, पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनि अंकुश जाधव, पोहेकॉ संजय मेढे,पोकाँ विशाल पाटील, पोकाँ प्रमोद पाटील, विशाल पाटील,रविंद्र भांबरे,पो.कॉ संभाजी बिजागरे,यांच्या पथकाने ही कार्यवाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!