२९ लाखाचा गुटखा, तंबाखू जप्त, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने धडक कारवाई करत दि. २३ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान नशिराबाद टोल नाक्या जवळ २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित पान मसाला, तंबाखू, असा मुद्देमाल जप्त केला.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक क्रं.
एचआर ३८, टी ५४१० मधून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात विक्रीसाठी बेकायदेशीररित्या अवैध तंबाखू गुटखा व सुगंधित पान मसाल्याची वाहतूक होत
असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान नशिराबाद टोल नाक्याजवळ आयशर ट्रक पकडला. पोलीसांनी आयशर ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित पान मसाला आणि तंबाखू आढळून आला.पोलिसांनी तो ट्रक जप्त केला.
या संदर्भात अकिल खान सुलतान खान वय-४८, रा. खंडवा, मध्यप्रदेश, फिरोज खान छोटू खान वय-३६ रा. इंदौर, मध्य प्रदेश, संजय (पूर्ण नाव माहित नाही) रा.सेंधवा मध्य प्रदेश आणि करडा (पुर्ण नाव माहित नाही) रा. चाळीसगाव या चार जणांविरोधात नशिराबाद पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.