क्राईमरावेर

लाखो रुपयांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, एक फरार, एक अटकेत

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बऱ्हाणपूर येथून रावेर मार्गे फैजपूर येथे येणारा आरोग्यास अपायकारक असल्याने राज्यात बंदी असलेला ४ लाख १७ हजार रुपयांचा अवैध गुटखा व मुद्देमाल असा ४ लाख ८१ हजार १२० रुपयांचा गुटखा फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने जप्त केला.

मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून रावेरमार्गे गुटख्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहितीवफैजपूर विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्या मिळालेल्या माहितीवरून शुक्रवार रोजी पहाटे तीन वाजे पासून बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर तपासणी मोहीम हाती घेत सापळा रचला. मारुती मंदिराजवळ वाहन तपासणी दरम्यान बुऱ्हाणपूरहून आलेली ॲपे पँजो MH 03 AH 7322 ला पोलिसांनी थांबवून ॲपे पँजो वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनातून २ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा १,४५६ पान मसाल्याचे पाउच (विमल ब्रँड), ९ हजार ६८० रुपयांचा वी-१ तंबाखू (४४० लहान पाउच), असा एकूण ४ लाख १७ हजार १२० रुपयांचा बंदी घातलेला गुटखा व ६० हजार रुपये किमतीचे पँजो ॲपे वाहन, ४ हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. असा एकूण ४ लाख ८१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक शेख वाजीद शेख आबीद (वय ३४, रा. धोबीवाडा, फैजपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक चौकशीत शेख जुबेर शेख इकबाल (रा. हाजिरा मोहल्ला, फैजपूर) याच्या सांगण्यावरून हा गुटखा फैजपूरमध्ये विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. यात एक आरोपी अटकेत आहे, तर एक फरार आहे. या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी अंकुश जाधव करीत आहेत. ह्या कारवाईत पो का महेंद्र महाजन, पो ना अक्षय पवार, व आबिद शेख यांचा सहभाग होता.

फैजपूर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची तस्करी व विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या कारवाई करण्याची मागणीही केली जात होती.या कारवाईने गुटखा तस्करांचे व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!