लाखो रुपयांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l अन्न औषध प्रशासन जळगाव यांनी एका वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेला ७ लाख २८ हजार ५० रूपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर – बोदवड मार्गावरून बोदवड येथे गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्याने मुक्ताईनगर – बोदवड रस्त्यावर बुधवार ५ जून रोजी सकाळी साडेनऊ च्या सुमारास सापळा रचून वहन क्रमांक एम. एच. १९ सी. व्हि ७८८८ या वाहनाला अडकऊन त्याची झडती घेतली असता त्यात हा मोठा साठा सापडला. हा साठा जप्त करण्यात आला असून वहन चालक अभिषेक ज्ञानेश्वर बारी, २४ ओम शांती नगर,बोहरा स्कूल जवळ, जामनेर. व आशिष लक्ष्मण दास बुऱ्हानी. मे.साईनाथ एजेंसी. बऱ्हाणपूर. यांच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार वय ३७ जळगाव यांचे फिर्यादीवरून
बोदवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.