भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

गुटख्याची गाडी पकडून सुद्धा आर्थिक हितसंबंधांमुळे पोलीस घटनास्थळी पोहोचण्यात असमर्थ

मुक्ताईनगर मध्ये लाखो रुपयाच्या गुटख्याची तस्करी, पोलीस प्रशासन हतबल…

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज  अक्षय काठोके :  मुक्ताईनगर शहरात दिवसा ढवळ्या मध्य प्रदेशातून लाखो रुपयांचा गुटखा येत असतो,  मुक्ताईनगर शहरांमध्ये अशाच एका लाखो रुपयांचा गुटका तस्करी करणारी गाडी पत्रकार व नागरिकांनी पकडून पोलीस निरीक्षकाना माहिती देऊन सुद्धा घटनास्थळी येण्यास पोलीस प्रशासन असमर्थ ठरल्याचे वास्तव समोर आले असून गाडी मालक फरार करण्यात पोलीस प्रशासनाचे असे वागण्याचे नेमके कारण आर्थिक हितसंबंधांची किनार असल्याची खमंग चर्चा शहरवासीयांमध्ये चांगलीच रंगली आहे.

आज सायंकाळच्या सुमारास नागरीक व पत्रकारांनी गुटख्याची गाडी पकडली असताना मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांना फोन लावून सुद्धा घटनास्थळी एक तासापर्यंत कुठले कर्मचारी पोचले नाही, गुटखा तस्करांकडून आमची वर पर्यंत लाईन असल्याची भाषा वापरली गेली तर गुटख्याची गाडी पोलीस स्टेशनसून दहा मिनिटाच्या अंतरावर असताना पोलीस कर्मचारी नेमके का पोहोचू शकले नाहीत याचे कारण गुलदस्त्यात असले तरी गुटका तस्कराना पळून जाण्यासाठी वेळ मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून व्यवस्तीत खबरदारी घेतल्याचे मुक्ताईनगर वासीयांकडून बोललेले जात आहे. तर दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला हप्ता पोहोचवला जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून अर्थपूर्ण संबंधातून अवैध धंद्याला संरक्षण दिले जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या विलंबाने शिकामोर्तब झाल्याची चर्चा नागरिकात ठीक ठिकाणी होत आहे.

संतांची भूमी असलेल्या मुक्ताईनगर शहरामध्ये लाखो, करोडो रुपयांचा अवैध गुटखा हा विक्री केला जात असून पोलीस प्रशासन आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे, असे होत असले तर पोलीस प्रशासन कशासाठी आहे असा प्रश्न उपस्तीत होत आहे. अशाप्रकारे अवैधंदे जर सर्रास राजरोस पणे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालत असतील तर शाळकरी विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात आहे शहरांमध्ये लाखो रुपयाचा गुटखा रोजच विकला जात असून आर्थिक लोभापायी नागरिकांच्या जीवाशी पोलीस प्रशासन खेळत असल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.

गुटख्याची गाडी पकडलेली असताना पत्रकारांनी निरीक्षकांना फोन लावून या बाबत माहिती दिली असताना ही पोलीस घटनास्थळी का पोहचले नाहीत?या बाबत मुक्ताईनगर पोलिसांच्या  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ? उपस्थित केले जात आहे. मागील काळात सुद्धा अवैध धंद्यामुळे मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा विषय विधानसभेत गाजविला होता व त्याच कारणामुळे मागील पोलीस निरीक्षक असलेले खताळ यांची मुक्ताईनगर येथून तडका फडकी जळगाव पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती

मध्य प्रदेशातून विमल गुटख्याची गाडी भरून केव्हा आणायची केव्हा धंदा बंद ठेवायचा याचे व्यवस्थित प्रशिक्षण किंवा तसे सूचना पोलिसांकडूनच विमल चालकांना दिले जात असून पत्रकारांनी बातम्या लावल्यास प्रशासनाच्या भरवशावर पत्रकारांना धमक्या दिल्या जातात ही गंभीर परिस्थिती पुन्हा मुक्ताईनगर निर्माण झाली असून यावर आता लोकप्रतिनिधी कारवाईची मागणी करतील का ? व वरिष्ठ अधिकारी कशी कारवाई करतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!