भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरराष्ट्रीय

गुटखा माफियांमध्ये खळबळ; लाखों रुपयांचा गुटख्यांने भरलेला ट्रक जप्त ! रावेर पोलिसांची कारवाई !

रावेर (विशेष प्रतिनिधी)। महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक मध्यप्रदेशच्या सीमेवरील चोरवड नाक्याजवळ पकडुन जप्त करण्यात आला आहे. यात लाखोंं रुपयांचा माल असल्याची माहिती असून ही कार्यवाही रावेर पोलीस स्टेशनच्या पथकाकडुन करण्यात आली आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून तस्करी केली जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात रावेर, यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गुटख्याची मागणी वाढली असून गुटख्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र-मध्य प्रदेश चोरवड सिमेवर रावेर पोलिसांनी गुटख्याने भरलेला ट्रक पकडला  आहे. पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मध्यप्रदेशातील इंदूर येथून गुटखा भरलेला एमपी ०९ जीजी ७६४२ या क्रमांकाचा ट्रक हा लोणी चेकपोस्ट पास करून महाराष्ट्रात चोरवड नाक्यावर आला होता. इंदूर येथून हा ट्रक जळगाव येथे जाणार होता. चेकपोस्ट येथे गस्तीवर असलेले पोलिस उपनिरिक्षक सुनिल कदम आपले सहकारी पोलिस कॉस्टेबल महेंद्र पाटील यांनी
वाहन तपासणी केली असता सदरील ट्रक मध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आल्याने रावेर पोलिसांनी ट्रक जप्त करून पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला असून सदरील ट्रक जप्त केल्याने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून या आधी यावल, फैजपुर सह अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पकडला गेल्याची उदाहरणे आहेत, रावेर पोलिसांनी पकडलेला ट्रक नेमका कुठे जात होता ? या बाबत चौकशी व्हावी.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!