सावदा परिसरात दोन लाखांचा गुटखा पकडला, सावदा पोलिसांची कारवाई
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारने आरोग्यास हानिकारक असलेल्या घुटक्यावर बंदी घातलेली असताना तसेच राजपत्राद्वारे उत्पादन, विक्री, वितरण, व साठा तसेच वाहतुक यासाठी प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करणेसाठी वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना सावदा पोलिसांनी पकडुन त्यांचे कडून २ लाख ५ ६० रुपये किमतीचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा जप्त केला.
सावदा पोलीस स्टेशन हद्दीत अनिल ओंकार पाटील, वय-४० वर्ष. रा.शिवाजीनगर जळगाव. व रोहीत मुकेश बरकले, वय-२२ वर्ष, रा.शिवपुर, ता.भुसावळ हे सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करणेसाठी वाहतुक करीत असले बाबतची गोपनिय माहिती सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ सावदा पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकास रवाना करुन आरोपी यांचेवर सापळा रचुन यांना लुमखेडा ता.रावेर शिवारात सावदा ते हतनुर धरण रोडवर पाटाचे चारीजवळ पकडुन त्यांचेजवळ २,००,५६० /-रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा मोटार सायकलीसह मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कारवाई सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक राहुल सानप,पोहेकाँ. संजीव चौधरी,पोकाँ. सुनिल कुरकुरे, पोकाँ. बबन तडवी यांनी केलेली आहे