भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“निकालानंतर राज्यात मोठा भूकंप,” ‘ निवडणुकीत मविआतील नेत्यांकडून आम्हाला आतून मदत’, खळबळ जनक गौप्यस्फोट

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत असून शिवसेना नेते तथा राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे ला होणार आहे. यानंतर ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील बडे नेते महायुतीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत आम्हाला आतून मदत करण्यात आल्याचा खळबळजनक दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

“अनेक नेत्यांनी आम्हाला या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे मदत केली आहे. निकालानंतर तुम्हाला याची प्रचीती येईल”, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर भाष्य करताना शंभूराज देसाई यांनी याबाबतचा मोठा दावा केला. शंभूराज देसाई एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी मविआबद्दल मोठा दावा केला. “त्या गटातील अनेक लोकांनी आतून आम्हाला मदत केली आहे. आम्ही आज त्यांची नावे सांगणार नाही. पण ४ जूननंतर महायुतीमध्ये लोंढा येईल. असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय
“ सरकारने जे काम केलं आहे त्याची पोचपावती जनता देणार आहे. महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय होईल”, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!