क्राईमनाशिकमहाराष्ट्र

EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो, पैसे दिले नाही तर….. उमेदवाराला मागितली खंडणी

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची राज्यात रणधुमाळी सुरू असून प्रचारात काहींनी वेग धरला असताना ठाकरे गटाच्या एका उमेदवारा कडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाकरे गटाचे नाशिक मधील उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यालयात जाऊन एका तरुणाने ईव्हीएम मशिन हॅक करून मी तुम्हाला जिंकून देतो, त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील. पैसे दिले नाहीत तर मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना सांगून तुमचा पराभव करु, अशी धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार नाशिक मधील उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महविकास आघाडीचे विधान सभेचे उमेदवार वसंत गीते यांचे मुंबई नाका इथे कार्यालय असून या कार्यालयात ५ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान भगवानसिंह चव्हाण हा परप्रांतीय तरुण आला. या तरुणाने “मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून देतो. १० मतांपैकी ३-४ मते तुम्हाला मिळवून देऊन निवडणुकीत जिंकून देतो. या बदल्यात ४२ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यातले ५ लाख आता द्या” अशी मागणी केली. “पैसे न दिल्यास प्रोग्रॅमिंग करणारे माझ्या ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमचाच पराभव करेन” अशी धमकी दिली. त्याने स्वत:चा पत्ताही पदाधिकाऱ्यांना दिला.

मात्र पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार देत पोलिसात तक्रार दाखल केली. या तरुणाचे नाव भगवांसिंग असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता भगवानसिंगने आपण दोन तीन आठवड्यापूर्वीच कामानिमित्त शहरात आलो असून निवडणुकीत पैसे कमावण्याची संधी म्हणून हा प्रकार मी केला असल्याचे भगवानसिंग याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!