भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

विलगीकरणासाठी घरात जागा नसल्याने कोरोना रुग्णाने झाडावर काढले 11 दिवस…

Monday To Monday NewsNetwork।

हैद्राबाद (वृत्तसंस्था)। नालगोंडा जिल्ह्यात कोविड19 च्या समस्या आरोग्य सुविधा, औषधं, लसीपूरता मर्यादित नाही. तर काही मुलभूत समस्या सुद्धा आहेत. ती म्हणजे विलगीकरणासाठी घरात जागा नसणे. भारतात अनेक कुटूंब एकाच खोलीत किचन आणि टॉयलेटसुद्धा असते. अशा परिस्थितीत कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात राहणे शक्य होत नाही.

नागलगोंडामधील एक 18 वर्षाच्या शिवा नावाच्या मुलाने स्वतःसाठी कोविड वार्ड तयार केला आहे. तो देखील झाडावर!….. शिवा या 18 वर्षाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या गावातील डॉक्टरांनी इतर कोठेही जागा नसल्याने त्याला गृहविलगीकरणात राहावयास सांगितले. तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती सरपंचानाही होती. त्यांनी शिवाला मदत केली नाही. शिवा पॉझिटिव्ह असल्याने आजूबाजूचे घराबाहेर पाऊल काढायलाही घाबरत होते.परंतु कुटूंबापासूनही लांब राहण्यास सांगितले. या पठ्ठ्याला यावेळी स्वतःला झाडावर विलगीकरणाची आयडीया सुचली. त्याने झाडावर मस्तपैकी बांबूच्या काड्यांचा बिछाना तयार केला. तो झाडावर ठेवला. अशा प्रकारे त्याने 11 दिवस काढले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!