भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

आठ सिंहांना कोरोनाची लक्षणं! हैदराबादेतील धक्कादायक प्रकार कुत्र्यां,मांजरीनाही व्हायरसची लागण !

Monday To Monday NewsNetwork।

हैदराबाद(वृत्तसंस्था)। हैदराबाद येथील प्राणी संग्रहालयातील सफारी पार्कमध्ये सिंहांना मांस न खाणं आणि सर्दी झाल्याच्या तक्रारीवरुन पशुवैद्यकीय पथकाने त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलं होतं. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली, परंतु याचा रिपोर्ट मिळणं अद्याप बाकी आहे. हैदराबादमधील प्राणीसंग्रहालय या महिन्याच्या 2 तारखेपासून जनतेसाठी बंद आहे.पशुवैद्यकीय पथकाला प्राण्यांच्या देखभाल वेळी यांच्यात कोरोनाची लक्षणं भूक न लागणं, नाकातून पाणी येणं, कफ यांसारख्या समस्या आढळल्या होत्या. त्यावरुनच त्यांची टेस्ट करण्यात आली आहे. या प्राणीसंग्रहालयात काम करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशभरात वाढतोच आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जगभरातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. रुग्णालयं, ऑक्सिजन,बेड्सची कमतरचा भासत असल्याने अनेकांचा मृत्यू होत असून परिस्थिती गंभीर झाली आहे. मनुष्य या कोरोनाशी लढा देत असताना आता कोरोनाची झळ आता प्राण्यांनाही पोहचल्याचं समोर आलं आहे. हैदराबाद प्राणीसंग्रहालयातील तब्बल आठ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कोरोनाची लक्षणं आढळल्या नंतर त्यांना तपासणीसाठी CCMB (सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी) येथे पाठवण्यात आलं होतं. आज त्यांचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.रिपोर्ट आल्यानंतर हैदराबाद मधील या सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यास, सिंहाला कोरोना झाल्याची ही भारतातील पहिलीच घटना ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार, चार मेल आणि चार फिमेल सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.गेल्या एप्रिल मध्ये न्यूयॉर्कमधील प्राणी संग्रहालयात सिंहाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर हाँगकाँगमध्ये मांजरी आणि कुत्र्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!