हैदराबाद नव्हे ” भाग्यनगर ” नामांतराचे संकेत? पंतप्रधान मोदी काय म्हणाले, रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट
हैदराबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादला ” भाग्यनगर ” म्हणाले, जे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताचा पाया रचला आणि आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपाची आहे, असे वक्तव्य भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. ते हैदराबादमध्ये बोलत होते. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सध्या हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक होत आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होत असतानाच भाग्यनगरचा म्हणजेच हैदराबादच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
“एक भारताचा रचला होता पाया” भारत अखंड ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. याच वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादमध्ये एक भारताचा, अखंड भारताचा पाया रचला. मात्र तो तोडण्याचा खूप प्रयत्न त्याकाळी झाला, असे भाजपा नेते रवीशंकर प्रसाद म्हणाले. आता याच हैदराबादला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भाग्यनगर” म्हटले आहे. येथूनच एक आता एक भारत वरून श्रेष्ठ भारत करण्याची जबाबदारी भाजपाच्या खांद्यावर आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा हैदराबाद “भाग्यनगर” चा राग आळवला आहे.