भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

यश मिळविण्याचा हमखास मार्ग म्हणजे परिश्रम – सचिन सकळकळे

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्ती ओळखा, आपले गुण अवगुण माहिती करून घ्या, परिश्रम घ्या म्हणजे यश हमखास मिळेल. असे प्रतिपादन सावदा येथे अध्यक्ष सचिन सकळकळे यांनी सावदा येथे पारितोषिक वितरण समारंभात केले.

ब्राह्मण हितवर्धिनी समिती सावदा तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक सोहळा श्री अभिजित ओवे यांच्या प. पू. रामचंद्र पारनेरकर महाराज मंदिरात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुरामच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाली. यावेळी स्वरूप सकळकळे, समर्थ सकळकळे सोहम मटकरी, गौरी जोशी, केतकी मटकरी, राधिका कुळकर्णी, या सह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे भुसावळ ब्राह्मण संघांचे सदस्य अतुल जोशी होते. त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये समाजाने एकजूट होणे गरजेचे असून नव्या पिढीने यासाठी पुढे व्हावे. अशी भावना व्यक्त केली. तर खिरोद्याचे माजी सरपंच दिनकर कुळकर्णी यांनी समाजाने मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रदीप कुळकर्णी, सानिका मटकरी, श्रीकांत मटकरी, रवींद्र कुळकर्णी, कविता सकळकळे, रितेश सकळकळे, केतन कुळकर्णी, अपूर्वा कुळकर्णी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अभिजित ओवे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!