…यांच्या कडे २० आमदार, शिंदे नाराज? पुन्हा राजकीय भूकंप!
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओस दौऱ्यावर गेले आहेत. आणि राज्यात पालकमंत्री पदावरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्या पासून महायुतीतील धुसफूस पुढे येत पालकमंत्री पदावरून मोठं नाराजीनाट्य सुरू झालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाले असून त्यांच्या दरे या गावी निघून गेले आहेत. शिंदेंची गरज संपली असा आरोप विरोधकांनी केला आहे.
पालकमंत्री पदाची यादी करतांना शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने फारसे महत्व दिलं नसल्याचं पुन्हा एकदा पुढं आलं आहे. शनिवार रोजी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदाची गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अदिती तटकरे यांच्यावर सोपविण्यात आली. यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली होती. या यादीचा उघड विरोध करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांना बोलून दाखवली.
दरम्यान, नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपदाची नियुक्ती स्थगित करण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही असतांना या दोन्ही नेत्यांना डावलण्यात आले.
आणि हाच मुद्दा उचलत विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. शिंदे यांची गरज संपली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आज पालकमंत्री बदलला आहे, तर परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरु आहे. बहुमतअसताना देखील पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली हे लाजिरवणे आहे. एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी कुंभमेळ्यात जावं. आयआयटीवाले बाबा पाहिले आता आपण दरेगाववाले बाबा पाहू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. सध्या त्यांच्या नाराजीचे कारण काय आहे? का वेळोवेळी हे नाराज होतात? रूसू बाई रूसू, कोपऱ्यात जाऊन बसू हे काय चालले आहे? एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी रुसले होते, तेव्हा ‘उदय’ होणार होता. दावोसला उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार गेले आहेत अशी माहिती असल्याचे म्हणत राऊत यांनी टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे नाराज झाले होते. त्यावेळी भाजपने उदय सामंत यांना पुढे करण्याचा विचार केला होता. फडणवीस यांनी उदय सामंत यांना दावोसला नेले होते, जेव्हा शिंदे रुसून बसले होते. उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार तयार होते. पण शिंदे सावध झाले, त्यामुळे हा प्लॅन बारगळला.
भाजपवर तीव्र शब्दांत टीका करत संजय राऊत म्हणाले की, “ भाजप फोडाफोडीचं राजकारण करणारा पक्ष ” “भाजप महाराष्ट्रात शिंदे गट फोडेल, अजित पवार गट फोडेल, आणि इतर पक्षांतही फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. फोडाफोडी हेच त्यांचं राजकारण आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा