हतनूर धरणाचे १० दरवाजे उघडले, तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुव्वाधार पाऊस पडत आहे. त्यातच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्या मुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाज्यांपैकी धरणाचे १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. सततच्या पाण्याच्या वाढीने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. त्या मुळे तापी नदीच्या काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. सोमवारी हतनूर धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे १.० मी. उंचीने सकाळी उघडले होते. तापी नदीपात्रामध्ये ३४९९६ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. पुढील काही तासांत ४५ हजार क्युसेक पर्यंत विसर्ग हतनूर धरणातून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असताना सायंकाळी १० दरवाजे उघडण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.