भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळरावेरव्हिडिओ

Video|हतनूर धरणाचा रुद्रावतार : सलग तिसऱ्या दिवशीही धरणाचे ४१ दरवाजे उघडे

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

सावदा, प्रतिनीधी| तापी नदीवरील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बेटिंग सुरू असल्याने गेल्या तीन दिवसांपासून रात्री १० वाजेपासून धरणाचे ४१ दरवाजे पूर्णक्षमतेने उघडण्यात आले असून आज दि २५ पर्यंत हे दरवाजर पूर्णपणे उघडे असल्याने तापी नदी पात्रात ५७ हजार क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडल्याने भुसावळ, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नागरीकांनी पाणी पाहण्यासाठी सावदा जाणाऱ्या पूलावर गर्दी केली होती . तसेच धरणाचे दरवाजे उघडे असल्याने पाटबंधारे याच्या कार्यालया लागून असलेल्या गेटजवळ नागरीकांनी गर्दी केली होती. मात्र या ठिकाणी कोणतीही घटना घडू नये म्हणून येथे पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे तर दी 25 रोजी रविवार असल्याने येथे अनेक नागरिकांनी पुर पाहण्यासाठी गर्दी केली होती दरम्यान धरणास पाणी आल्याने धरण भरले असून यावर अवलंबून असलेल्या गावंचा पाणी प्रश्न मिटला आहे, तर पुढे असलेल्या अनेक प्रकल्पात देखील पानी साठा धरणातून पाणी सोडल्याने वाढनार आहे.
हतनुर धरणात पुरेसा पाणी साठा होऊन ते भरले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!