भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

प्रभू श्री रामाच्या बाणाने उत्पन्न “कालिंका मातेचा झिरा” बघितलाय ? मुक्ताईनगर महामार्गावरील जंगलातील अपरिचित रामझिरा नेमका कुठे आहे ?

इतिहासाची साक्ष देणारा अक्षय काठोके यांचा स्पेशल वृतांत- :

मुक्ताईनगर, स्पेशल वृतांत-अक्षय काठोके : बोदवड ते मुक्ताईनगर महामार्गावरील कालिंका माता अर्थात महाकाली देवी मंदिर दोन्ही तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या धार्मिक स्थळाला ‘कालिंका मातेचा झिरा’ ग्रामीण भागातील नागरिक संबोधतात. हा संपुर्ण परिसर जंगलात असून तो वन विभागाच्या अधिकार क्षेत्राखाली आहे. या ठिकाणी महाकाली मातेचे छोटेसे मंदिर असून प्राचीन मूर्ती आहे. मंदिराच्या शेजारी विहीर असून त्या विहिरीचे पाणी इंचभरही कमी होत नाही असा इतिहास या बारामाही पाणी असणाऱ्या विहिरीचा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी इथे बाण मारल्यावर झिरा निर्माण होऊन पाणी कायम राहत असल्याचे पूर्वजांच्या कथांनुसार एकावयास मिळते. भिल्ल समाज बांधवांचे या धार्मिक स्थळावर सर्वाधिक नितांत श्रद्धा आहे.

याबाबत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मंडे टू मंडे न्यूजच्या माध्यमातून वाचकांना या इतिहासीक ठिकाणची अधिक माहिती देण्याचा हा प्रयत्न, येथे काही वर्षे अगोदर जामनेर तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ महाराज मंदिरातील महाराज कुटिया करून राहत होते. ते मौन व्रताच्या माध्यमातून दिवस-रात्र यज्ञाच्या समोर ध्यानस्थ अवस्थेत पुजापाठ करायचे. परंतु , उपवनसंरक्षक तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात अतिक्रमण केल्याप्रकरणी ती कुटिया पाडून त्यांना येथून बाहेर काढले असल्याची माहिती मिळाली. हे मंदिर परिसर बोदवड तालुका व मुक्ताईनगर तालुका यांच्या मधोमध येते. त्यामुळे यास माळेगांव जंगलातील जागृत देवस्थान बोलले जाते. या धार्मिक स्थळापासून एका बाजूला आमदगांव, दुसऱ्या बाजूला माळेगाव अशी दोन गावे आहेत. धार्मिक स्थळाच्या पाठीमागे काही किलोमीटर अंतरावर फरकांडा जंगलातील आमदगाव धरणाचे काम सुरू आहे. या जंगलात जागृत हनुमंताचे मंदिर असून फरकांडा मारुती म्हणून हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. येथील प्राचीन गढी नामशेष झाली असुन पाय विहिरीचे अवशेष काही प्रमाणात शिल्लक आहे.

महाकाली मंदिर परिसरातील ‘रामझिरा’ जंगलात नेमका कुठे..?

तालुक्यातील भाविक ‘महाकाली मंदिरात’ मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. शेजारील बारामाही पाणी असलेल्या विहिरीला भाविक ‘राम झिरा’ म्हणून संबोधतात. विशेष म्हणजे या विहिरीचे एक इंचही पाणी कमी होत नाही याला साक्षात चमत्कार मानावा लागेल. मंदिराच्या मागील बाजूस साधारणतः दीड किलोमीटर अंतरावर एक छोटेसे मंदिर आहे. तेथे प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारल्याचा इतिहास आहे. या परिसरात लहान आकाराचा खोल खड्डा असून त्यातून पाणी निघत असते. हा अपरिचित इतिहास भाविकांना माहित नाही. त्यामुळे सत्य घटनेबाबत उलगडा करणे हा यामागचा हेतू. या स्थळापासून काही अंतरावर एका टेकडीत प्राचीन गुफा आहे. येथे योगी साधुसंतांनी ध्यान साधना केल्याची माहिती आम्हाला मिळाली. हि गुफा प्राचिन असल्याने अवशेषांच्या माध्यमातून प्राचिन इतिहासाची ग्वाही देत आहे. नागरिकांना अनेक वर्षांपासूनचा इतिहास फारसा माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या वृतांत मागील उद्देश एकच आपल्या सभोवताली असलेल्या पुरातत्त्व वास्तू, इतिहासही मंदिरे यांच्या इतिहासाला उजागर करणे असून या ठिकाणी आपण एकदा अवश्य भेट द्या, प्रभू श्रीरामचंद्रांनी इथे बाण मारल्यावर झिरा निर्माण होऊन पाणी कायम राहत यांचे दर्शन नक्की घ्या… पुन्हा भेटू अश्याच एका इतिहासाची साक्ष देणाऱ्या स्पेशल वृतांत घेऊन.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!