भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

नवरात्रीत “अशी” करा घटस्थापना ; नवरात्र उत्सव का साजरा केला जातो? आख्यायिका काय? शुभ मुहूर्त व साहित्य जाणून घ्या…

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील विविध भागांत नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी, असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते. दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया शक्तीचे या काळात पूजन केले जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात

नवदुर्गेची नऊ रुपे
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत; ज्यांचे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजन केले जाते. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येथे येतात.

नवरात्री तारीख, मुहूर्त
पितृपक्ष संपत आला की, शरद ऋतूची चाहूल लागते. शारदीय नवरात्रोत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होईल.

घटस्थापना मुहूर्त
घटस्थापना मुहूर्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर, अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.

घटनस्थापना केव्हा केली जाते?
“अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात; तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही. “अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकता. एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत. या नऊ रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते. म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. बरेच भक्त नऊ दिवस उपवास करतात.

अशी केली जाते घटनस्थापना
१. प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून, तिचा दोन बोटांचा जाड चौकोनी थर लावावा. त्यात पाच किंवा सात धान्ये टाकावीत घालावी. उदा. जवस, गहू, तीळ, मूग, राळे, सावे व चणे इ.

२. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन, त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी.

३. सप्तधान्ये आणि कलशस्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास, त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.

४. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवीचे ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रांची पारायणे करावीत. त्यामध्ये देवीचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवी भागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमता आणि सामर्थ्यानुसार कराव्यात.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी.

नवरात्रीचा उत्सव का साजरा केला जातो? त्या मागे आख्यायिका काय? महीतीय तुम्हाला?…
महिषासुर नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता. त्याला अमर व्हायचे होते आणि त्या इच्छेपोटी त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की त्यांना हवे ते वरदान मागू शकतो. महिषासुराने स्वतःसाठी अमर होण्यासाठी वरदान मागितले. महिषासुराचे असे बोलणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, ‘या जगात जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे लोक जीवन-मरण सोडून जे हवे ते मागतात.’ हे ऐकून महिषासुर म्हणाला, “ठीक आहे प्रभू, मग मला असे वरदान द्या की, मी कोणत्याही देवता किंवा राक्षसाच्या हातून किंवा मनुष्याच्या हातून मरणार नाही. तो स्त्रीच्या हातून व्हावा.’

महिषासुराचे असे बोलणे ऐकून ब्रह्माजी तथास्तु बोलले आणि निघून गेले. यानंतर महिषासुर राक्षसांचा राजा झाला, त्याने देवांवर हल्ला केला. देवता घाबरले. जरी त्यांनी एकजुटीने महिषासुराचा सामना केला, ज्यामध्ये भगवान शिव आणि विष्णूने त्यांना साथ दिली, परंतु महिषासुराच्या हातून सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटी महिषासुराने देवलोकावर राज्य केले.

महिषासुरापासून त्याचे रक्षण करण्यासाठी सर्व देवतांनी भगवान विष्णूसह आदिशक्तीची पूजा केली. त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश निघाला. ज्याने दुर्गा मातेने सुंदर अप्सरेचे रूप धारण केले. दुर्गादेवीला पाहून महिषासुराने तिच्यावर मोहित होऊन तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो.

देवी दुर्गा मान्य झाली पण एका अटीवर..तिने सांगितले की महिषासुराला तिच्याशी युद्ध जिंकावे लागेल. महिषासुराने सहमती दर्शविली आणि मग युद्ध सुरू झाले जे 9 दिवस चालले. दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. आणि तेव्हापासून हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!