ब्रेकिंग : साहेबांकडून काम करून आणून देतो, नगर भूमापनचा खाजगी पंन्टर लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात
जळगाव जिल्ह्यातील कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या साठी १५ हजारांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील खाजगी
इसम (पंन्टर ) याला जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे ३० वर्षीय पुरुष असून त्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या साठी अविनाश सदाशिव सनंसे वय ४९ वर्षे, व्यवसाय- खाजगी कर्मचारी, नगर भुमापन अधिकारी कार्यालय, जळगांव.( खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांच्याकडे नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून सदर काम करुन आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे प्रथम प्रत्येक नोंद घेण्यासाठी १५,००० व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी १५०० रुपयाची मागणी करून तडजोडीअंती १००० रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आरोपी अविनाश सदाशिव सनंसे वय ४९ वर्षे, व्यवसाय- खाजगी कर्मचारी, नगर भुमापन अधिकारी कार्यालय, जळगांव.( खाजगी इसम) यांचे विरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगांव, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून
सदर कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव. सापळा अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. जळगांव. पोकॉ/ राकेश दुसाणे, पो कॉ/ अमोल सुर्यवंशी यांनी केली.
