भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

पाडळसे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, गटारी सफाई न झाल्यास संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

पाडळसे, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज. विठ्ठल कोळी | “झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागं करता येत नाही,” या शब्दांत यावल तालुक्यातील पाडळसे या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

पाडळसे  ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना तोंडी आणि लेखी अर्ज करूनही नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात असल्याची संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये आहे. मते मागताना मतदारांच्या पाया पडणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवतात, अशी टीकाही करण्यात आली आहे.

दिलीप काका चौधरी यांच्या घरासमोर असलेल्या गटारीची स्थिती पाहता गावातील इतर भागातील परिस्थिती आणखी भयानक आहे. महिन्यानमहिने गटारीची सफाई होत नसल्यामुळे दुर्गंधी, डास आणि आजारांचे प्रमाण वाढले आहे. सफाई केलीच तर त्यात जमा होणारा कचरा वेळेत उचलला जात नाही, असा आरोप करण्यात येतो आहे.

तायडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ग्रामपंचायत पदाधिकारी जर गावकऱ्यांच्या समस्या सोडवू शकत नाहीत, तर त्यांनी तसे जाहीर करावे. गावकऱ्यांच्या समस्या आम्ही आमच्या पातळीवर सोडवू.”

नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिनांक ७ एप्रिल रोजी जर गटारीची सफाई झाली नाही, तर ग्रामपंचायत सरपंच यांच्या निवासस्थानी आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

“आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार राहतील,” असा स्पष्ट इशारा माजी सरपंच तायडे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!