जळगाव

कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवक नितीन वानखेडे हे अनेक वर्षांपासून शिरपूर येथे आरोग्य सेवक कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ड्यूटी वरून दुचाकीने जळगाव येथून म्हसावद येथे घरी
येत असताना रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने झालेल्या भीषण अपघातात उपचारादरम्यान वानखेडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणीते एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

नितीन भाऊलाल वानखेडे (वय ४०, रा. म्हसावद ता. जळगाव) हे अनेक वर्षांपासून शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून ते सेवा होते. शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ते प्रशासकीय काम झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता म्हसावद येथे घरी दुचाकीने परत येत असताना अचानक रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने त्यांचे नियंत्रण सुटून त्यात त्याचा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ४ दिवसानंतर मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नितीन भाऊलाल वानखेडे त्यांची प्राणज्योत मालविली. ते म्हसावद येथे आई-वडील, पत्नी, चार मुले यांच्यासह राहत होते
या घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!