भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

हृदयद्रावक घटना : रुग्णवाहिकेची सोय नसल्याने आई-वडिलांची दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ कि.मी. पायपीट

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मुले आजारी पडल्याने मुलांना पुज्याऱ्याकडे नेले परंतु तेथेच त्याची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याचा मृत्यु झाला. तरीही जन्म दात्यानी दवाखाना गाठला परंतु तो पर्यंत खूपच वेळ होऊन गेला होता. डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. तेथून १५ किलोमीटर लांब घरी जाण्या साठी वाहनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने अखेर दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत घरी गेले.

बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीनय वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. ही घटना गडचिरोली मधील अहेरी तालुक्यातील पत्तिगाव येथे ४ सप्टेंबर रोजी घडली.

दोन दिवसांपूर्वी आई वडिलांसोबत दोन भावंडं आजोळी पत्तीगाव येथे आले होते.४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला त्या पाठोपाठ दिनेशही आजारी पडला.आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी दिली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दोन्ही भावंडांचे कडेवर घेऊन भाबड्या आशेपोटी हे दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले.

यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. त्यानंतर नातेवाइकाची दुचाकी बोलावून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले. रुग्णवाहिकेची सोय नसल्याने आई-वडिलांना आपल्या चिमुकल्या मुलांचे मृतदेह घेऊन १५ किलोमीटरची पायपीट करावी लागली.

या बाबत आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच बरोबर आई वडिलांनी दवाखान्या ऐवजी सुरुवातीला अंधश्रद्धे पोटी पुजाऱ्या कडे नेले. औषधोपचार ऐवजी जुन्या पिढी नुसार अंधश्रद्धेवर असलेला हाच अंध विश्वास या प्रकरणाला करणी भूत ठरला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!