भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात जोरदार पाऊस, “या” जिल्ह्यांना झोडपणार, सतर्कतेचा इशारा,अलर्ट जारी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बहुतेक ठिकाणी तुफान पाऊस पडताना बघितलं. बुधवारी झालेल्या पावसाने पुणे, मुंबई, कोकण, रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपले. आजही गुरुवार, ता. २६ व २७ सप्टेंबर या दोन दिवस राज्यभरात  जोरदार बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई मध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने जळगाव, ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, नाशिक, धुळे, पुणे संभाजी नगर जिल्ह्यातील भोकरदन, सिलोड, वर्धा, लोणार, जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, नगर सातारा कोल्हापूर , संभाजीनगर जालना मध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण जळगाव जिल्हा, संभाजी नगर जिल्हा सह ,भोकरदन, जालना, बुलढाणा, बुलढाण्यातील देऊळगाव राजा, शिंदखेड राजा, अमरावती ,अकोला, नागपूर पर्यंत २६ व २७ दोन दिवस विजांच्या कडकडाटासह,जोरदार वारा, गारां सह जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.स्वतःचे रक्षण करा, झाडाखाली थांबू नका .तसेच जनावरांची विशेष काळजी घ्या.असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यातही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

तसेच बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे.

असून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!