भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनराष्ट्रीय

यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार ….., ! ‘EVM’ बाबत सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केलं स्पष्ट

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज झालेल्या सुनावणीत ईव्हीएममध्ये झालेल्या मतांची व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून पुनर्पडताळणी करण्याच्या मागणीचा निकाल सुप्रीम कोर्टाने सुरक्षित ठेवला आहे. तसेच संशयाच्या आधारावर निर्णय घेतला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे. ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीची माहिती घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडून माहिती मागितली, तसंच आयोगाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यालाही सुप्रीम कोर्टात बोलावलं.

सुप्रीम कोर्टानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं की, “यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत, निवडणुका ‘EVM’वरच होणार” असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती, त्यानंतर कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलं.

निवडणुका यापुढे बॅलट पेपरवर होणार नाहीत, असं कोर्टाने सुनावणीवेळी स्पष्ट केलं. निवडणुका ईव्हीएमवरच होतील त्यात येत्या काही काळात सुधारणा करता येतील का हे पाहू, असंही कोर्टाने स्पष्ट केलं,’ असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

‘मायक्रो कंट्रोलर या तीनही मशीनमध्ये असतो, सिंबल लोडिंग युनिट ४,५०० आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा डेटा आमच्याकडे ४५ दिवस सेव्ह असतो, त्यानंतर तो डिलीट होतो. तीनही युनिटमध्ये फिट केलेला प्रोग्राम एकदा वापर झाला की आपोआप बर्न होतो’, असं उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिलं. ईव्हीएमबाबत कायम विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांबद्दल निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं आहे, त्याबाबत काही भ्रम आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या शीर्ष अधिकाऱ्याकडून याबाबत स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता आसल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!