राज्यात पावसाचा ‘हायअलर्ट’ १८ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस, जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना इशारा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मध्यंतरी थांबलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या आठ ते दहा दिवसांनंतर मोसमी पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. राज्यातील बहूतांश भागात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला आहे. तर जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्याला पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.