एरंडोलक्राईमजळगाव

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील हायस्कूल मुख्याध्यापक १० हजारांच्या लाचेचा बळी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मागील प्रलंबित वेतन निच्चीतीची रक्कम मिळऊन देण्याच्या मोबदल्यात एकूण रक्कमेच्या पाच टक्के प्रमाणे मागणी करून शेवटी तडजोडी अंती दहा हजारांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कूल च्या मुख्याध्यापकाला जळगाव एसीबी ने रंगेहाथ अटक केली. मुख्याध्यापकांच्या अटक मुळे शिक्षण श्रेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की,बजळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील निपणे येथील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कूल चे ३३ वर्षीय शिपाई हे तक्रारदार असून त्यांच्या मागील प्रलंबित वेतन निच्चीतीच्या फरकाची रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक,माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांचेकडे पाठविण्यात आला असता प्रस्ताव मंजुरीचे काम मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांनी स्वतः च्या ओळखीने करून दिले होते.त्याचा मोबदला म्हणून एकूण रक्कमेच्या पाच टक्के म्हणजेच १२,५०० रुपये लाचेची मागणी २५ जून रोजी मुख्याध्यापक महाजन यांनी केली.तडजोडीत शेवटी १० हजार रुपये ठरले.

या बाबत तक्रारदाराने जळगाव एसीबी कडे तक्रार दाखल केली. २७ जून गुरुवार रोजी दुपारी सापळा रचण्यात येऊन तक्रारदार शिपाई यांचे कडून मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन, वय ४४ वर्ष. याला १० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना एसीबी ने अटक केली.नसदरची कारवाई जळगाव एसीबी चे पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, एपीआय दीनेशसिंग पाटील,बाळू मराठे व सहकाऱ्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!