परमपूज्य वात्सल्य शिरोमणी उपाध्याय मुनिश्री १०८ विशेष सागरजी महाराज यांचे आज सावद्यात आगमन
सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | येथील भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त व मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज दि. ८ एप्रिल मंगळवार रोजी सावदा शहरात संध्याकाळी परमपूज्य वात्सल्य शिरोमणी उपाध्याय मुनीश्री १०८ विशेष सागरजी महाराज यांचे आगमन होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता फैजपूर रोड वरील साईबाबा मंदिर समोर गुरुदेव यांचे स्वागत समाज बांधवांतर्फे करण्यात येईल. तरी सर्व समाज बांधव व सावदा शहरातील नागरिक बंधू भगिनींनी मुनीश्रींचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन समाज सावदा तर्फे करण्यात आले आहे.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त गुरुदेव यांच्या सानिध्यामध्ये यावर्षी महावीर जयंती उत्सव साजरा करण्याचे पुण्य लाभलेले असून दि. ९ एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडेसात वाजता सहावा मंदिर वर्धापन दिन निमित्त मूलनायक श्री चंद्र प्रभू भगवान पंचामृत मस्तकाभिषेक व विधान संध्याकाळी सहा वाजता भजन संध्या,आनंदयात्रा व गुरुभक्ती दिनांक १० रोज गुरुवार सकाळी सहा ४५ वाजता श्रींची शोभायात्रा त्यानंतर श्री भगवान महावीर स्वामी पंचामृत अभिषेक पूजन व गुरुपूजन उपाध्याय प्रतिष्ठापन पद गुणांनुवाद संध्याकाळी सहा वाजता महाआरती आनंदयात्रा व गुरुभक्ती असे दोन दिवस भव्य दिव्य असे कार्यक्रम सावदा येथील हजार १००८श्री चंद्रप्रभू व सहस्त्रकुंड जिनालय दिगंबर जैन मंदिरात साजरा होणार आहे .
या कार्यक्रमासही व दर्शनार्थ सर्व सावदा शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल जैन समाजातर्फे अध्यक्ष डॉक्टर दीपक जैन,उपाध्यक्ष देवेंद्र अन्नदाते ,सचिव विमलेश जैन,ट्रस्टी योगेश घोडके, ट्रस्टी अभिजीत मिटकर व इतर समाज बांधवांनी केले आहे.