भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

ज्या दिवशी पाऊस आलाय त्या दिवशी इतिहास घडलाय– रोहिणी खडसे, पवार आणि ती पावसातील ऐतिहासिक सभा

मंडे टू मंडे न्युज स्पेशल वृतांत :

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : रात्रीच्या अंधारात विचारपीठ व सातारा जिल्हा परिषद मैदानात हॉलिजनच्या प्रकाशात दिसणाऱ्या पावसाच्या सरी. त्यातूनच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar Satara sabha) प्रचारानिमित्त भिजतच केलेले पावसातील भाषण ऐतिहासिक ठरले. या घटनेच्या इतिहासाचा दाखला देत पाऊस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा फार जवळचा संबंध असून,”ज्या ज्या दिवशी पाऊस आला त्या त्या दिवशी इतिहास घडला ” असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ वेळी साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेचा दाखला दिला.

साताऱ्यात १८ ऑक्टोबर २०१९ ला भर पावसात शरद पवार यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत भर पावसामध्ये उभे राहून शरद पवार यांनी केलेले भाषण हे चांगलेच गाजले. त्या सभेचा परिणाम सातारा निवडणुकीत दिसून आला. पवारांनी घेतलेली सभा ही ऐतिहासिक सभा ठरली होती. शरद पवार यांचे निकटवर्तीय श्रीनिवास पाटील यांनी या सभेने दस्तुरखुद्द प्रस्थापित उमेदवार भाजपाचे उदयनराजे भोसले यांचे निवडणुकीत पराभव झाला अशी नोंद झाली. या ऐतिहासिक सभेला उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे म्हणाल्या, पाऊस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा फार जवळचा संबंध असून,”ज्या ज्या दिवशी पाऊस आला त्या त्या दिवशी इतिहास घडला ” असे नमूद करत पवारांच्या सभेचा उल्लेख केला. मुसळधार पाऊस असूनही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आणि नागरिकांची गर्दी ही मतदारसंघात परिवर्तनाची लाट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत नक्कीच यात्रेची फलश्रुती दिसेल असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला

यावेळी आमदार एकनाथराव खडसे यांनी विरोधकांना विकासाची स्पर्धा करण्याचे आवाहन केले कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना फक्त नी फक्त जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या निवारण कशा करता येतील या उदात्त हेतूने रोहिणी ताईंच्या मनातील जनसंवाद यात्रेस आज शुभारंभ होत आहे यात्रेच्या माध्यमातून 182 गावातील मतदारांशी संपर्क साधला जाईल संपूर्ण कार्यक्रमांतर्गत नव्याने किमान 30 हजार सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे “वन बूथ थर्टी युथ” ही संकल्पना राबवून संघटना मजबूत करणे, नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करणे हा संवाद यात्रेचा उद्देश असल्याचे आमदार खडसे यांनी स्पष्ट केले.

प्रसंगी बोदवड तालुका निर्मिती मीच केली, त्यामुळे नागरिकांची शासकीय कामे बोदवडलाच होऊ लागली. वेळ आणि पैसा वाचला. 1990पर्यंत बोदवड तालुक्यात एकही डांबरी रस्ता नव्हता. तालुक्यातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून बोदवडचा विकास साधल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!