भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

होमगार्ड यांनी केली अपघातग्रस्त महिला होमगार्डच्या परिवारास आर्थिक मदत

बलवाड़ी. ता. रावेर. आशीष चौधरी | निंभोरा बु. ता. रावेर येथील काही दिवसा पूर्वी महिला होमगार्ड सौ. विजया सुपडू फेगडे यांचे दोन मुले जळगांवकडे कामा निमित्त जात असताना त्यांचा अपघात झाल्याने एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलास गंभीर दुखापत झाली होती.

त्या दुसऱ्या मुलास  गंभीर दुखापत झाल्याने त्याचे ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने सावदा युनिटचे समादेशक दिपक खाचणे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा बु. येथील होमगार्ड प्लाटून अधिकारी संतोष काटोले, प्लाटून अधिकारी भास्कर जाधव यांनी तसेच ५४ होमगार्ड बांधवांनी एकत्रित येऊन तसेच पोलीस व काही सुज्ञ ग्रामस्थांनी एकत्र येऊन सुमारे ३१,५०० रुपयांचा निधी सौ. विजया फेगडे व त्यांच्या परिवाराला देऊन मदत केली. यावेळी होमगार्ड समादेशक दिपक खाचणे, प्लाटून अधिकारी संतोष काटोले, होमगार्ड राजेश पाटील, विलास महाले, देवानंद मसाने, विजय चौधरी, समाधान कोळी, अमोल अजलसोंडे, प्रविण तायडे यासह होमगार्ड व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!