भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

‘करारा जवाब मिलेगा’, उद्या “दूध का दूध, पानी का पानी” होईल, Fadnavis यांच्या आरोपावर गृहमंत्र्यांचे सूचक इशारा

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्टिंग ऑपरेशनचे पेन ड्राईव्ह सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती. यानंतर विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष लागले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावून घेतले होते. या बैठकीत सुषमा चव्हाण यांनी सर्व कागदपत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

गिरीश महाजन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर पुण्याच्या एसीपी तपास अधिकारी सुषमा चव्हाण या पुण्यातून थेट मुंबईत आज सकाळी दाखल झाल्या.त्यानंतर त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली आणि संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सुषमा चव्हाण आणि संजय पांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सुषमा चव्हाण यांनी आपल्यासोबत आणलेली कागदपत्र गृहमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहे. सुषमा चव्हाण यांनी पुणे कार्यालयातून ही सर्व कागदपत्र आणली होती.

दरम्यान या बैठकीआधी दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. काल सभागृहात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज उत्तर देणार होतो. त्यासाठी तयार होतो. पण त्यांनी मागणी केली होती की, उद्या चर्चा व्हावी. त्यामुळे मी उद्या उत्तर देईल. त्यांनी खरेतर कायदा सुव्यवस्था यावर बोलायचे होते. पण ते त्यांच्या कर्तव्यापासून दुर गेले आहे. उद्या माझ्या उत्तरानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, ‘करारा जवाब मिलेगा’ असे म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!