भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

हनी ट्रॅप : प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वारंवार खंडणीची मागणी. महिलेला रंगेहात अटक

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील एका धनाढ्य प्रतिष्ठित व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून वारंवार पैसे उकळून खंडणी मागणाऱ्या महिलेला एक लाख रूपया स्वीकारतांना रावेर पोलिसांनी रंगेहात अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती २ नोव्हेंबर २०१८ मध्ये स्वतः च्या कार मध्ये जळगाव येथे जात असतांना एका ४३ वर्षाच्या महिलेने गाडीत लिफ्ट मागीतली . सोबत प्रवास केल्यामुळे त्यांची मैत्री वाढली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिने सदर इसमास जेवणास बोलवले. सदर महिलेने कोल्ड्रीक्स मध्ये गुंगीचे औषध टाकुन त्यास बेशुद्ध करून त्याचे सोबत शारीरिक संबंध केल्याचा बनाव करत तिने त्याचे व्हिडिओ चित्रण करून सदर इसमाच्या घरी व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी सदर इसमास देऊ लागली. व वारंवार पैशांची मागणी करू लागली. हा प्रकार सतत घडत होता.  सदर व्यक्ती प्रतिष्ठित व धनाढ्य असल्याने सदर इसमाला भीतीपोटी वारंवार तिच्याकडे जावे लागत होते. यानंतर ती वारंवार खंडणी मागु लागली.

२३ डिसेंबर २०२३ पासून सदर महिला व तिचा मुलगा निर्मल पाटील (वय २१) या दोघांच्या खात्यात फोन पे द्वारे सुमारे ११ लाख रुपये टाकले होते. यामुळे त्या महिलेची मागणी वाढतच गेली. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर महिलेने  फिर्यादी व्यक्ती कडून  ५ कोटी रुपये घेतल्याचा लेखी करारनामा पावती करून घेतला होता. या महिलेची पैशांची मागणी नेहमीच  वाढत गेल्यामुळे सदर इसम त्रस्त झाला होता. सततच्या प्रकाराला कंटाळून अखेर त्रस्त व्यक्तीने रावेर चे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना आपली घडलेली आपबिती सांगितली.

सदर व्यक्तीच्या फिर्यादीवरून बुधवार १९ मार्च रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास जयस्वाल यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे, महिला पोलीस माधवी सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल महेश मोगरे ,सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण यांचे पथक पाठवून या महिलेवर कारवाईचे निर्देश देत तिला रंगे हात पकडण्यासाठी सापळा रचून रावेर बऱ्हाणपूर मार्गावरील येथील एसएसबीटी मार्ट या दुकानाच्या मागील बाजूस सदर फिर्यादी इसमास महिलेने एक लाख रुपये घेऊन बोलावले असता त्या महिलेस पोलिसांनी पैसे स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

या संदर्भात  सदर व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्टेशनला ” त्या ” महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव पुढील तपास करीत आहेत.

या घडलेल्या प्रकाराची परिसरात मोठी चर्चा सुरू असून असाच हनी ट्रॅप चा प्रयोग करून या मार्गाने या महिलेने आणखी कोणाकोणाला जाळ्यात अडकवले आहे का ? या महिले सोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणखी किती जणांची फसवणूक झाली? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!