भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत कुळकर्णी यांचा सावदा येथील ब्राह्मण समाजातर्फे सत्कार

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे सरकार दरबारी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नुकताच पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला, त्यामध्ये सावदा येथील दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत कुळकर्णी यांचा देखील पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार केला गेला. याचे औचित्य साधून सावदा येथील ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे अध्यक्ष सचिन सकळकळे यांच्या हस्ते प्रशांत कुळकर्णी यांचा सत्कार केला गेला.


सावदा येथे कार्यरत असलेले प्रशांत कुळकर्णी गेल्या काही वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. यावेळी समाजाच्या सहकार्यानेच मी आज इथवर यशस्वी रीतीने पोहोचू शकलो, त्यामुळे समाजाच्या कोणत्याही चांगल्या कार्यासाठी सदैव मदतीसाठी तयार असल्याची भावना कुळकर्णी यांनी बोलून दाखविली. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप कुळकर्णी, कोषाध्यक्ष सानिका मटकरी, श्रीकांत मटकरी, कविता सकळकळे, सचिव रवींद्र कुळकर्णी, अपूर्वा कुळकर्णी, निलेश कुलकर्णी, दिपक कुळकर्णी, धनश्री कुळकर्णी, मुन्ना कुलकर्णी, सतीश जोशी यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!