यावल तालुक्यात घराला आग, एक लाखाचे नुकसान
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील मागास वर्गीय वस्तीतील एका घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून त्या आगीत संसारोपयोगी वस्तू जाळून जवळ जवळ एक लाख रुपयांचे नुकसान झाले.ही आग यावल तालुक्यातील बोराळे येथील घराला दि.२५ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडली.
यावल तालुक्यातील बोराळे या गावी मागासवर्गीय वस्तीत भाड्याच्या घरात राहत असलेले शरद दिनकर वानखेडे हे गुरुवारी सकाळी घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले असता सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेच्य दरम्यान घराला अचानक आग लागली,ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझेस्तोवर घरातील संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले होते.चौकशी अंती ही आग शाट सर्किट मुळे लागल्याचे समोर आले.या आगीचा पंचनामा बोराळे तलाठी मधुराजे पाटील यांनी केला असून आगीत संसारोपयोगी वस्तू जाळून खाक झालेल्या नुकसानग्रस्तला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जातं आहे.