महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किती मृत्यू झाले?आकडा आला समोर
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ३० जणांचा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमधील २५ जणांची ओळख पटली आहे तर ५ जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच ६० भक्त जखमी
झाले असल्याची माहिती धार्मिक मेळाव्याच्या सुरक्षेची देखरेख करणारे पोलिस प्रमुख वैभव कृष्णा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
प्रायाग राज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये मौनी अमावस्येनिमित्त गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी म्हणून अनेकांनीच संगमाच्या दिशेनं धाव घेतली. या दरम्यान पोल क्रमांक ९० ते ११८ मध्ये एकच गोंधळ माजला तिथं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. प्रथमदर्शींच्या माहितीनुसार रात्री दीड वाजेच्या सुमारास बॅरिकेड उघडल्यानंतर एकाएकी लोकांचा लोंढा नियंत्रणाबाहेर गेला आणि इथं चेंगराचेंगरी झाली. त्या नंतर अमृत स्नान करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता.
दरम्यान महाकुंभ मेळ्यात क्षमतेहून अधिक गर्दी झाल्यामुळं संगमावर येऊन पवित्र स्नान करण्याचा आग्रह सोडत जिथं गंगा आहे तिथं हे स्नान करावं असं आवाहन महा कुंभ मेळ्यातील महंतांनी केलं. .चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने अमृत स्नान करण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर गर्दी झाल्यानंतर आखाड्यांनी अमृतस्नानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
कुंभमेळा या पृथ्वीवरील सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे. ४० कोटी लोक या महामेळाव्यात यंदा शाही स्नान करतील अशी आकडेवारी जारी झाली होती