भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

केंद्रात शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला किती मंत्रिपदे? काय आहे फॉर्म्युला?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर काल ( शुक्रवार) एनडीएच्या घटक पक्षांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जेपी नड्डा आणि अमित शहा यांनी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांशी नवीन सरकारच्या स्थापनेबाबत आणि मंत्र्यांच्या खात्याबाबत चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रात एकनाथ शिंदे गटाला दोन तर अजित पवार गटाला एक मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप, जेडीयू, टीडीपी, शिवसेना आणि एलजेपी (R) या सर्व प्रमुख मित्रपक्षांना शपथविधी समारंभादरम्यान सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिले जाईल. म्हणजेच शपथविधी सोहळ्या दरम्यान त्या पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. प्रत्येक घटक पक्षाला किमान एक तरी मंत्रिमंडळ मिळेल आणि भविष्यात मंत्रिमंडळाच्या फेरबदल आणि विस्तारात त्यांना अधिक सहभागी केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

९ जून ला होणार शपथविधी
रविवारी संध्याकाळी (९ जून) नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री परिषदेच्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!