PM Modi Speech in Parliament: इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे, मोदींचा शेरो शायरीतून काँग्रेसवर घणाघाती हल्ला …
मंडे टू मंडे मुंबई प्रतिनिधी
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत भाषण केलं. या भाषणावर विरोधी पक्षाने आपलं मत मांडलं. आज या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केलं .
मुंबई: केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत भाषण केलं. या भाषणावर विरोधी पक्षाने आपलं मत मांडलं. आज या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणातून मोदींनी काँग्रेस (congress) आणि आम आदमी पार्टीवर जोरदार निशाणा साधला. मोदींनी शेरोशायरीतूनही काँग्रेसवर हल्ला चढवला. वो मगरुर है खुद की समज पर बेइंतहा, इन्हे आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड देंगे, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. त्यानंतर मोदींनी काँग्रेसनेच देशातील नागरिकांना कोरोना (corona) फैलावण्यासाठी उकसवल्याचा आरोपही मोदींनी केला. मुंबईत काँग्रेस नेते यूपी आणि बिहारच्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी जाण्यास सांगत होते. त्यासाठी त्यांना पैसेही देत होते. तुमच्या राज्यात जा आणि कोरोना फैलवा असं सांगत होते, असा गंभीर आरोप मोदींनी केला. त्यामुळे काँग्रेस सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अहंकारी संबोधत जोरदार हल्ला चढवला. प्रश्न निवडणुकीच्या निकालाचा नाही. सवाल तुमच्या नैतिकतेचा आहे. इतके वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही देशातील जनता तुम्हाला का नाकारत आहे? आम्ही एक निवडणूक हरलो तरी एको सिस्टिम काय काय करते. तुम्ही एवढ्या निवडणुका हरल्यानंतरही तुमचा अहंकार जात नाही. अधिर रंजन चौधरी यांनी अनेक शेर ऐकवले. मीही ही संधी घेतो. अहंकाराचीच गोष्ट निघाली आहे. त्यावर मीही तुम्हाला एक शेर ऐकवतो, असं मोदी म्हणाले.
वो जब दिन को रात कहे तो तुरंत मान जाओ, नही मानोगे तो वो दिन में नकाब ओढ लेंगे, जरुरत हुई तो हकीकत को थोडा बहोत मरोड लेंगे, वो मगरुर है खुद की समज पर बेइंतहा, इन्हे आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड देंगे…
असा शेर मोदींनी सादर करून काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला.
पराभवाचा पाढा वाचला ..
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पराभवाचा पाढाच वाचला. तुम्हाला लोकांची नस माहीत असती, तुम्ही जनतेत मिसळले असते तर तुम्हाला या गोष्टी कळल्या असत्या. तुमच्यापैकी अनेक लोकांचे सुई-काटे 2014मध्ये अडकलेले आहेत. त्यातून तुम्ही बाहेर पडत नाहीत. तुम्ही स्वत:ला एका मानसिक अवस्थेत अडकवून ठेवलं आहे. लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. काही आता ओळखत आहेत. तर काही भविष्यात ओळखतील. नागालँडच्या लोकांनी 1988मध्ये काँग्रेसला मत दिलं होतं. त्याला आता 24 वर्ष झालं आहे. ओडिसाने 1995मध्ये तुम्हाला मत दिलं होतं. त्यालाही 27 वर्ष झाले आहे. अजूनही ओडिसात तुमची एन्ट्री झाली नाही. गोव्यात 1994मध्ये तुम्हाला पूर्ण बहुमत मिळालं होतं. 28 वर्ष झाली गोव्याने तुम्हाला स्वीकारलं नाही. 1988 त्रिपुराने मत दिलं होतं. 34 वर्षापूर्वी. अजूनही तिथे तुम्ही सत्तेत नाहीत. यूपी, बिहार आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे हाल आहेत. म्हणजे शेवटी 1995मध्ये 37 वर्षापूर्वी मतदान केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये 1972मध्ये म्हणजे 50 वर्षापूर्वी मतदान केलं होतं. तामिळनाडूच्या लोकांनी 1962 म्हणजे 60 वर्षापूर्वी संधी दिली होती. तेलंगना बनविण्यचां श्रेय घेता पण त्यांनीही तुम्हाला संधी दिली नाही. झारखंडचा जन्म झाला 20 वर्ष झाले. त्यांनीही पूर्णरुपने तुम्हाला स्वीकारलं नाही. तिथे मागच्या दरवाजाने तुम्ही सत्तेत असतात, असे चिमटे मोदींनी काढले.