“मी मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक”, “पोलिस दलात तुला नोकरी लावून देतो” तरुणीला लाखोंचा गंडा
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा वापर करत पोलिस मध्ये नोकरी लावून देतो. असे सांगत एका १९ वर्षीय युवतीची तब्बल साडेचार लाख रुपयात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा येथे एका तरुणीची पोलिस मध्ये लावून देतो मी मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार दिलीप बनकर हे माझ्या खूप जवळचे आहेत. असे सांगत अभिषेक प्रभाकर पाटील या तरुणाने निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या १९ वर्षीय युवतीला पोलिस दलात नोकरी लावून नेण्याचे आमिष दाखवून तिच्या कडून तब्बल साडेचार लाख रुपये उकळले.
इतकेच नव्हे तर त्याने स्वाती व तिच्या आईला मुंबईत नेत, दादरला काही दिवस ठेवले. तिथे तिला नियुक्तीची बनावट ऑर्डर दाखवली. नंतर अकॅडमीत प्रवेश दिला व आठ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी स्वातीच्या आईने त्याला चार लाख रुपये दिले होते.
मात्र आपली फसवणूक झाल्याचे स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या तरुणीच्या लक्षात आले. तरुणीने सायखेडा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अभिषेक प्रभाकर पाटील याला अटक केली असून त्याला आता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीने आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का याचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.


